*टाईम्स इंजिनिअरिंग च्या सर्वेक्षणात पंढरपूर सिंहगडचा पहिल्या १७० उत्कृष्ट महाविद्यालयात समावेश*
○सर्वेक्षणात जिल्ह्यातील पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग एकमेव काॅलेज
पंढरपूर: प्रतिनिधी
द टाईम्स बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट चा २०२३ चा भारतातील १७० इंजिनिअरिंग काॅलेजचा सर्वेक्षण अहवाल टाईम्स इंजिनिअरिंग सर्वेक्षण २०२३ या बेबसाईवर उपलब्ध झाला असुन भारतातील सर्वोच्च १७० इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चा समावेश झाल्या असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
भारतातील सर्वाधिक सर्वोच्च इंजिनिअरिंग काॅलेजचे सर्वेक्षण द टाईम्स बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट कडून करण्यात येत असते. यावर्षी भारतातील १७० इंजिनिअरिंग काॅलेज यामध्ये असुन हे सर्वेक्षण महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्याशाखा, करिअर प्रगती आणि प्लेसमेंट, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व विकास, महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना प्रदान केलेले पर्यावरण व संसाधने, उद्योग इंटरफेस, ग्लोबल एक्स्पोजर, शैक्षणिक फि संरचना आदींसह निकषांवर आधारित भारतातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेजचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
या सर्वेक्षणात सोलापूर जिल्ह्यातील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर हे एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज चा समावेश झाला असुन एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर चा भारतातील सर्व सहभागी इंजिनिअरिंग मधुन १२३ वा क्रमांक समावेश झाला आहे.
या सर्वेक्षणाचा उद्देश भारतातील सर्वोच्च इंजिनिअरिंग काॅलेज ओळखणे आणि त्यांना क्रमवारी लावणे हा मुख्य उद्देश या सर्वेक्षणा आहे. या सर्वेक्षणामध्ये डेस्क रिसर्च, तथ्यात्मक सर्वेक्षण आणि आकलनीय रेटिंग सर्वेक्षण हे ३ प्रमुख मॉड्यूल्स होते.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजने अल्पावधीतच अभियांञिकी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चालू शैक्षणिक वर्षांत राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून नॅक ए प्लस मानांकान प्राप्त केले असून महाविद्यालयात सद्या तीन संशोधन केंद्रे असून या माध्यमातून जवळपास २५ हून अधिक विद्यार्थी पीएच डी करीत असुन पीएच डी साठी आवश्यक मार्गदर्शन व साहित्य पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये उपलब्ध आहेत.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज हे भारतातील सर्वोच्च इंजिनिअरिंग काॅलेज च्या सर्वेक्षणात १२३ व्या क्रमांकावर नाव समाविष्ट झाल्याने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.