*पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रतिक्षा घोलप बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शनिवार दिनांक १० जुन २०२३ रोजी चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
चालू शैक्षणिक वर्षांतील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्कार प्रतिक्षा घोलप या विद्यार्थिनीला सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यादरम्यान उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डॉ. श्रीगणेश कदम आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या दरम्यान सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली कुमारी प्रियंका चव्हाण हिने गेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आला. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल चार वर्षांतील शैक्षणिक आठवणींना उजाळा दिला. चतुर्थ वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे आजी विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाब फुल व पेन देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमिञा सांगोलकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. शेखर पाटील यांनी मानले.