रौप्यमहोत्सवी वर्षात स्वेरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


रौप्यमहोत्सवी वर्षात स्वेरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


एन.आय.आर.एफ. २०२३ मध्ये १५१ ते ३०० या बँडमध्ये स्थान प्राप्त!



पंढरपूर-‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालया अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) च्या इंडीया रँकिंगस् २०२३ मध्ये १५१ ते ३०० या बँड मध्ये स्थान प्राप्त झाले आहे. स्वेरीच्या या यशाचा फायदा विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक व उद्योजकीय क्षमता वाढविण्यासाठी होणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

         'स्वेरी ही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया उंचावत असताना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी विशेष प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षणेही दिली जातात. या प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना उद्योजकता विकासासाठी होतो तसेच ही प्रशिक्षणे विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप, रिसर्च अँड इनोव्हेशन, इकोसिस्टम्स डेव्हलपमेंट यासारखे अनेक गुण रुजविण्यासाठी उपयोगी ठरतात. संशोधनातून नवनिर्माण करण्याच्या धर्तीवर केले गेलेले हे विशेष प्रयत्न विद्यार्थ्यांना भविष्यात उत्कृष्ट कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठीही उपयोगी ठरतात. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या सर्वांगीण गुणांच्या विकासासाठी विशेष मार्गदर्शनपर व्याख्याने व कार्यशाळा स्वेरीमध्ये सातत्याने आयोजित केल्या जातात.  या सर्व उपक्रमांची नोंद एन.आय.आर.एफ. रँकिंगस् मध्ये घेतली जाते.' अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) च्या स्वेरीतील समन्वयक डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली. स्वेरीच्या विशेष उपक्रमांची पावती म्हणून विविध आस्थापनांकडून स्वेरीला कधी विशेष मानांकने तर कधी भरीव संशोधन निधी प्राप्त झाला आहे आणि आता २०२३ या वर्षामध्ये स्वेरीचा उल्लेख नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) च्या इंडीया रँकिंगस् २०२३ अंतर्गत उल्लेखलेल्या सर्वोकृष्ट इन्स्टिट्यूटस् मध्ये १५१ ते ३०० या बँड मध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमासाठी देशभरातून विविध प्रवर्गातून १४१७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यापूर्वी स्वेरीने एनबीएचे मानांकन तसेच नॅक कडुन ४ पैकी ३.४६ सी.जी.पी.ए. सह ‘ए प्लस’ हे मानांकन प्राप्त झाले आहे. स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षात स्वेरीला एन.आय.आर.एफ. २०२३ मध्ये १५१ ते ३०० या बँडमध्ये स्थान मिळाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. स्वेरीला एन.आय.आर.एफ. २०२३ मध्ये मिळालेल्या या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad