*पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात*
पंढरपूर: प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यासाठी पालक मेळावा एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २६ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आवा होता हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
या पालक मेळाव्याचे उद्घाटन विद्येचे आराध्य दैवत असलेल्या सरस्वतीचे पूजन पालक प्रतिनिधी विनोद शेंडगे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. अतुल आराध्ये, प्रा. ऋषिकेश कुलकर्णी आदींच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी एलसीडी स्क्रीनच्या द्वारे शैक्षणिक आढावा व मुलांच्या प्रगती विषयी माहिती पालकांना दिली. याशिवाय महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेले विविध उपक्रम, त्यांच्या अंगभूत असलेले कौशल्याला वाव देण्यासाठी सिंहगड कॉलेज स्टार्टअप च्या माध्यमातून करीत असलेले संशोधन, प्लेसमेंट, विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत प्लेसमेंट अशा अनेक विषयांवर सविस्तर वृत्तांत पालकांसमोर मांडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले.