*पंढरपूर सिंहगडच्या विद्युत अभियाञिकी विद्यार्थ्यांची विद्युत कंपनीला भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्युत अभियांञिकी मधील
द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी २२० के. व्ही., ३२ के व्ही. महावितरण नेर्ले सबस्टेशनला औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते. या भेटीचा मुख्य उद्देश औद्योगिक वातावरणाची ओळख करून घेणे आणि विद्युत ऊर्जा पारेषण प्रणालीचे व्यावहारिक ज्ञान मिळवणे हा होता.
या भेटीतून विद्यार्थ्यांला पॉवर ट्रान्समिशनची सविस्तर माहिती आणि व्यावहारिक ज्ञान मिळाले. फीडर, सर्किट ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर, आयसोलेटर, बस बार, प्रोटेक्टिव्ह रिले, लाइटनिंग अरेस्टर्स, वेव्ह ट्रॅप, लोड ब्रेक स्विचेस आणि त्यांचे बांधकाम, कामाचे सिद्धांत यासारख्या सबस्टेशनमध्ये वापरल्या जाणार्या विविध उपकरणांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
औद्योगिक भेटीची व्यवस्था करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले, समन्वय प्रा.एन.व्ही. खांडेकर प्रा. के.पी. जाधव व विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.