इंजिनिअरिंग युथ फेस्टिवल’मध्ये स्वेरीला सर्वसाधारण विजेतेपद


‘इंजिनिअरिंग युथ फेस्टिवल’मध्ये स्वेरीला सर्वसाधारण विजेतेपद




पंढरपूर- इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयईआय) यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरमध्ये नेहरूनगर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ‘इंजिनिअरिंग युथ फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये सोलापूर जिल्हयातील विविध व्यावसायिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने विविध क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे त्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

       ‘इंजिनिअरिंग युथ फेस्टिवल’ अंतर्गत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुले खो-खो, कब्बडी या क्रीडा प्रकारात विजेते तर हॉलीबॉल मध्ये उपविजेते ठरले तसेच धावणे या क्रीडा प्रकारात त्यांनी विजेतेपद व उपविजेतेपदही पटकावले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यार्थिनी देखील खेळात अग्रेसर होत्या. खो-खो स्पर्धेत बालाजी दामाजी शेंबडे याच्या नेतृत्वाखाली मुलांनी विजेतेपद पटकावले. मुलींच्या खो-खो स्पर्धेत देखील कु.सोनाली रमेश मिसाळ हिच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. कबड्डी मध्ये कु.धनश्री राजकुमार व्यवहारे हिच्या नेतृत्वाखाली विजेतेपद तर हॉलीबॉल मध्ये दीपक संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपविजेतेपद पटकावले. वैयक्तिक खेळामध्ये धावण्याच्या १०० मीटर प्रकारात दीपक शिंदे विजेते, २०० मीटर धावण्यात अविराज विजय नागटिळक यांनी विजेतेपद तर त्यातच विराट शेटे यांनी उपविजेते पद पटकावले. ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत धनश्री व्यवहारे ही विजेता ठरली तर ४ बाय १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलींनी बाजी मारली यामध्ये स्नेहल शंकर अंबुरे, सोनाली मिसाळ, श्रेया रमेश कानडे, प्राजक्ता मच्छींद्र खाडे यांचा समावेश होता तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत निशा शिंदे ही विद्यार्थिनी विजेती ठरली. मराठी वकृत्व स्पर्धेमध्ये शिवभक्ती देशमुख, रांगोळी मध्ये स्नेहल अंबुरे व शिवभक्ती देशमुख, पुस्तक परीक्षण मध्ये गणेश जगदाळे व सुरज करंडे, मेहंदी स्पर्धेत मयुरी जगदाळे व शिवभक्ती देशमुख, मराठी निबंध स्पर्धेमध्ये रुही गणेश तेंडुलकर, हिंदी वादविवादमध्ये अमोल बेद्रेकर व ज्ञानेश्वरी गोफणे, अॅप्टी क्विझ मध्ये पल्लवी बचुटे, ट्रेक क्विझ मध्ये जगदीश हनमवाले व राहुल तुळे, ट्रेडिशनल ड्रेस मध्ये स्नेहल खुने, अनिता शिंदे व निकिता म्हेत्रे, सुगम गायन स्पर्धेमध्ये नुपूर पवार, ऋतुजा ठेंगील, इंग्रजी वादविवादमध्ये आद्या सातारकर, मराठी वादविवाद मध्ये सृष्टी नारायण व अॅटो कॅडमध्ये सत्यजित गोफणे आदी विद्यार्थी विजेते ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. संजय मोरे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. ‘इंजिनिअरिंग युथ फेस्टिवल’ मध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले यामुळे त्यांचा सत्कार जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. तुषार ठोंबरे यांच्या हस्ते व स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, नॅकचे मार्गदर्शक डॉ.संतोष राजगुरू, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेव कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, विश्वस्त व श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी खेळाडूंचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad