लोहयात राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सहात साजरी

 लोहयात राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सहात साजरी 



  *नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 




लोहा शरात दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

           यावेळी गोरबंजारा समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रसंत श्री सेवावाल महाराज जयंती निमित्त राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या तेलचित्राची भव्य मिरवणूक रथात श्री शनिदेव मंदीरापासुन ते व्यंकटेश गार्डन पर्यंत या मुख्य रस्त्यावरुन ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील पोलवर लाऊड स्पिकर लावून राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांचे गीते लावण्यात आले. तसेच बंजारा गीत ही मिरवणूकीत गाऊन पारंपारिक वेशभूषत ऩृत्य सादर करण्यात आली.

            राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांच्या भव्य तेलचित्राच्या मिरवणूकीचे विसर्जन लोहा शहरातील व्यंकटेश गार्डन येथे करण्यात आले.त्यानंतर मिरवणूकीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड मतदार संघाचे  आ.डॉ. तुषार राठोड होते तर प्रमुख उपस्थीती बंजारा क्रांतीदलाचे संस्थापक अध्यक्ष देविदासभाऊ राठोड, जयंती मंडळाचे अध्यक्ष आपानाईक पवार, स्वागताध्यक्ष माजी पं.सदस्य बालाजी राठोड,सल्लागार अर्जुन राठोड, लोहा न.पा.चे गटनेते करीमभाई शेख,शिवसेना उपशहरप्रमुख माधव राठोड,मुखेड बाजार समितीचे सभापती खूशालराव पाटील , शासकीय गुत्तेदार नारायण जाधव, अविनाश पवार, रुस्तुम राठोड,विष्णू चव्हाण, डॉ .दिनेश राठोड,ग्रामसेवक रमेश राठोड, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. श्रीदेवी चव्हाण, डॉ. प्रल्हाद जाधव, लोहा न.पा.चे कार्यालयीन अधिक्षक उल्हास राठोड, विकास राठोड, संकेत चव्हाण,किरण राठोड, इंजी.शिवाजी राठोड, उॉ.विश्वनाथ राठोड, डॉ. सुरेश जाधव, यांच्यासह मोठया संख्येने बंजारा समाज बांधव ,महिला भगीनी उपस्थीत होते.

                    यावेळी मुख्य मार्गदर्श करतांना आ.तुषाठ राठोड म्हणाले की मी सर्वप्रथम येथे राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो .मी सातत्याने तीन वर्षापासुन लोहा येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयतीच्या कार्यक्रमाला येतो .लोहा तालुक्यात आपला कुणी मोठा नेता नाही.मी कार्यक्रमाला मान सन्मान घेण्यासाठी आलो नाही तर तुमच्यात बदल करायला आलो आहे.

                         येथे तांडयावर विकास झाला नाही तांडयावरची परिस्थिती बदलली पाहिजे. आपण देशभर विखुरले गेलो आहोत त्यामुळे समाजाची ताकद व संख्या दिवस नाही . पोहरादेवीला २ लाख लोक येतात तेथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आले होते. हा  समाज देशाच्या राजकारणात फार मोठा बदल करु शकतो .

                       लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये राजा हा मातेच्या उदरातुन जन्म घेत नाही तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या हक्कातून मतपेटीतून जन्म घेतो .जयंतीच्या माध्यमातुन आपले प्रश्न सुटले पाहिजे १० ते १५ हजार लमानी काय करु श्कतात ते एखादयाला विधानसभेत पाठवू शकतात तर एखादयाला विधानसभेला पाडू शकतात. या भागात व तालुक्यात फार तांडे आहेत दुर्गम भाग आहे.मी जरी या मतदार संघाचा आमदार नसलो तरी त्यांना पक्या रस्त्यांनी जोडुन देतो . समाजाच्या विकासासाठी अभिवचन देतो असे आ. तुषार राठोड म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तावीक सरपंच अर्जुन राठोड यांनी केले तर आभार बळीराम जाधव यांनी मानले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad