हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्तपंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे ग्रामस्थांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
शाळेतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय साधनाचे वाटप करण्यात आले,
रांजणीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच वस्ती शाळेवर विद्यार्थ्यांना वही पेन तसेच प्राथमिक उपचार किट वाटप करण्यात आले. याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे, डान्स स्पर्धा, व्याख्याने याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
शिवजयंती निमित्त शाळेतील विद्यार्थीच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले तर, आदर्श राजा शिवछत्रपती अशा विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी यांना अनुक्रमे तीन आणि उत्तेजित तीन बक्षीसे, देण्यात आली.सांगलीचे व्याख्याते प्राध्यापक सुनील लाड यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास याविषयी विचार व्यक्त केले.
तसेच दुसऱ्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे ठेवण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून समाजाची जागृती केली. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिवजयंतीनिमित्त याच विद्यार्थ्यांचा डान्स स्पर्धा आयोजन केले होते.
या वेळी 'जय भवानी-जय शिवाजी'च्या घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम, आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.