*॥ श्री स्वामी समर्थ आबासाहेब तायडे कर्नबधिर विद्यालयाची उंच भरारी.* दिव्यांगाच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड ...
पाटणबोरी : - कै . आबासाहेब तायडे कर्नबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत या विद्यालयाच्या विद्यार्थ्याची निवड झाल्याने क्रीडा क्षेत्रात कर्णबधिर विद्यालयाने भरारी घेतली आहे . दिव्यांग कल्याण आयुक्तालय म.रा.पुणे • जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील नेहरू क्रिडा संकुलावर जिल्हास्तरीय दिव्यांग मुला - मुलीच्या क्रिडा स्पर्धा दि . 26,27 28 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते . यामध्ये के . आबासाहेब सायडे कर्नबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वयोगट 8 ते 12 मुले मुली वयोगट 13 ते 16 मुले - मुली वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेतला होता . विद्यालयाचे विनोद कु . सुंदरी नारायण मेश्राम ही वयोगट 13 ते 16 , 100 मीटर धावणे या स्पर्धेत जिल्हयातून प्रथम क्रमांक पटकाविले . वयोगट 13 से 16 मूली , गोळा फेक् या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला . 8 ते 12 वयोगटातील कु . काजल बाजीराव खरतडे ही लांब उडी या खेळात जिल्ह्यातून प्रथम स्थान मिळवून नैपुण्य प्राप्त केले . अजय अन्नरवार हा वयोगट 13 ते16 मुले गोळा फेक य या मध्ये तिसरा क्रमांक मिळविला . तसेच गजानन विठु चापरे हा वयोगर 13 ते 16 मुले लांब उडी या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला . जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेले सर्व खेळाडू राज्यस्तरीय
क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे . जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी श्री . अमोल येडगे साहेब , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . डॉ . श्रीकृष्ण पांचार साहेब , जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री . पियुष चौहान साहेब. उपस्थितीत पार पाडलेल्या या स्पर्धेत विद्यालयाच्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा करीता निवड झाल्यामुढे संस्था डॉ . चंद्रकांत · तायडे , सचिव भरतभाऊ तायडे , यांनी कौतुक केले .