नायगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार ; बेसमिटमध्ये काळी माती
■ संबंधित विभागाचे अधिकारी ,जे.ई.यांची चौकशी करून कारवाई करण्याची उपोषण कर्त्याची मागणी
नायगांव ता.प्र .( परमेश्वर पा.जाधव)
नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या परिसरात सुरू असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या करिता बांधण्यात येत असलेल्या प्रकार ४ च्या इमारतीच्या बेसमिटमध्ये ढबर, मुरुम न भरत परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचे पूर्वीचीच काळीमाती बेसमिटमध्ये टाकून वर मुरुमाचा थर देऊन शासनाचे लाखो रुपये हडपणार्या संबंधित अभियंता जी.डी.बारसकर कामाचे जे.ई. ए.एम.सिद्दीकी व गुत्तेदार यांनी संगनमत केले असून योग्य त्या कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी पासून सामाजिक कार्यकर्ते प्रकशभाऊ निवृत्ती हणमंते यांनी उपोषण सुरू केले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव च्या परिसरात सुरू असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या करिता प्रकार ४ चे निवास्थानसाठी इमारतीचे बांधकामासाठी शासनाने लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला मात्र संबंधित विभागाचे अधिकारी ,जे.ई.व गुत्तेदार यांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रकशभाऊ हणमंते यांनी बांधकाम परिसरात सुरू असलेल्या प्रकार चार इमारत बांधकामावरील बेसमिटमध्ये ढबर भरण्या ऐवजी जेसीबीच्या साहाय्याने काळी माती टाकून त्याच काळ्या मातीवर मुरूमाचा थर देऊन शासनाची दिशाभूल करून लाखो रुपयांचा निधी हडप करणारे संबंधित विभागाचे अधीकारी ,जे.ई. व गुत्तेदार यांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करून बोगस सुरू असलेले बांधकाम थांबवावे असे सामाजिक कार्यकर्ते प्रकशभाऊ निवृत्ती हणमंते यांनी दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी पासून आमरण उपोषणास बसलेल्या निवेदनात नमूद केले आहे.