बेरळी गावाच्या सर्वागीण विकासासाठी मी सदैव कट्टिबद्ध - बाळासाहेब बुध्दे.
तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडण्याऐवजी गावचा शाश्वत विकास गरजेचा आहे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार
लोहा तालुक्यातील मौजे बेरळी खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २०२२ प्रक्रिया सुरू झाली असून या गावचा विकास आजही कागदावर आहे.गावातील समस्या रस्ते, पाणी, वीज आदी अद्याप ही कायम आहेत. सत्ताधिशानी सत्तास्थाने मिळविली,शासनाकडून कोट्यावधीचा निधी खर्च झाला, मात्र विकास कुठे केला हा संशोधनाचा प्रश्न आहे.नागरिकांचे महत्वाचे प्रश्न अजूनही तसेच आहेत.या प्रश्नाची सोडवणूक करण्याबरोबर गावचा नावलौकिक वाढविण्यासाठी वार्ड क्रमांक ३ मधून अपक्ष सुशिक्षित उमेदवार सौ.ज्योती बाळासाहेब बुध्दे या उभ्या राहिल्या असून त्यांची निवडणूक निशानी जग हे आहे तरी गावातील सुज्ञ नागरीकांना आवाहन करण्यात येत कि, येत्या १८ डिसेंबर २०२२रोजी रविवारी जग निशानीवर आपले बहुमोल मतदान देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन वार्डात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रचार करताना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती लोहा तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुध्दे यांनी केले आहे.
आपण सातत्याने गावच्या विकासासाठी लढत आहे, संघर्ष करत आहे. समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांना ग्रामपंचायत आपली वाटली पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे,गावात सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्नशील असून आपला लढा सातत्याने सुरू आहे.
थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होणार असल्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी तरूणाई इच्छूक आहे. त्यामुळे घराणेशाही मोडीत निघणार असून त्यांच्या मक्तेदारीला लगाम बसणार आहे. सरपंच कोणाला करायचे याबाबतचे सर्वाधिकार आता जनतेच्या हातामध्ये असल्यामुळे आजतागायत ज्यांनी ग्रामपंचायतीची सत्ता उपभोगली आहे, अशा व्यक्तींना एखाद्या खड्यांप्रमाणे दूर करण्याची संधी आता गावातील जनतेला मिळाली आहे.
शासनाकडून १५व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जातो. हा निधी सरपंचाच्या सहीने खर्च होतो. या निधीसह ग्रामपंचायतीमधील इतर महत्वाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सरपंचला बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी आता साम, दाम, दंड ही राजकीय निती वापरली जात आहे.गावांत अनेक वर्षे सत्ता उपभोगूनही तीच मंडळी पुन्हा सरपंच पदाच्या रिंगणात आहेत. त्यामुळे गटाच्या नावाखाली स्वार्थ साधणाऱ्या मंडळीविरोधात बंड होण्याची शक्यता असून 'धनशक्ती विरुद्ध 'जनशक्ती' अशा लढती होण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्रामस्थांकडून तरुण, सुशिक्षित होतकरू आणि गावाच्या विकासकामांना योगदान देणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल अशी आशा बुध्दे यांनी यावेळी व्यक्त केली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये धनदांडग्या गटनेत्यांकडून मतदारराजाला अनेक तात्पुरती प्रलोभने दाखवली जात आहेत. ‘आपण म्हणेल त्याच्याकडे गावची सत्ता' अशा पद्धतीने वाटचाल सुरु असून त्यांच्याकडून अयोग्य उमेदवारांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडण्याऐवजी गावच्या शाश्वत विकासासाठी पारदर्शी उमेदवारांना निवडून देऊन गावचा सर्वांगिण विकास करणे गरज आहे.असे पुढे बाळासाहेब बुध्दे यांनी सांगितले.
वार्ड क्रमांक ३च्या अपक्ष उमेदवार सौ.ज्योतीताई बुध्दे यांनी गावातील वृध्द महिलाच्या समस्या सोडवून सर्वागीण विकासासाठी आपण कट्टिबद्ध आसल्याचे मत प्रतिपादन केले.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला आपला देश गणला जातो दिल्ली ते गल्लीपर्यंत राजकारणात पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन सक्षम पणे राजकारणात महिला सुद्धा तेवढयाच शक्तीने काम करताना दिसत आहेत.बेरळी या गावाला राजकीय,सामाजिक.आर्थिक संस्कृती आहे.येथील महिलाच्या समस्याना प्रथमतः प्राधान्य देऊन.गावातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अपक्ष उमेदवार यांनी यावेळी सांगितले. शिक्षण,आरोग्य,विज, पाणी, रस्ता नाल्या व विशेषतः स्वच्छता अभियान प्रत्येक घरात शौचालय ही संकल्पना राहाणार असल्याचे मत वार्ड क्रमांक ३ चे सुशिक्षित अपक्ष उमेदवार सौ.ज्योतीताई बाळासाहेब बुध्दे यानी व्यक्त केले.