शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी संघटना अभिजीत पाटील यांच्यासोबत* *विठ्ठलच्या निवडणुकीत रयत क्रांती शेतकरी संघटनेचा पाठींबा जाहीर*

 *शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी संघटना अभिजीत पाटील यांच्यासोबत*



*विठ्ठलच्या निवडणुकीत रयत क्रांती शेतकरी संघटनेचा पाठींबा जाहीर*


पंढरपूर/प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील राजकारण श्री विठ्ठल सह साखर कारखान्याच्या निवडणुकीने ढवळून निघाले आहे. सत्ताधारी विठ्ठल परिवारात उभी फूट पडली आहे. अशातच या कारखान्यावर परिवर्तन करायचेच या उद्देशाने अभिजीत पाटील यांनी निवडणुकीत उतरण्याची मागील अनेक महिन्यापासून तयारी केली आहे. यासाठी त्यांना सर्वच भागातून चांगला पाठींबा मिळत आहे.


    या निवडणुकीत किती उमेदवार आणि किती पॅनल उतरणार यापेक्षाही निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर कारखाना चालवून शेतकरी आणि कामगार यांचे हितासाठी कोण निर्णय घेईल याची पुरेपूर भविष्यवाणी ही अभिजीत पाटील यांच्याकडे वळत आहे. याचाच विचार करीत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कायम लढणाऱ्या शेतकरी संघटनांनी याबाबत योग्य निर्णय घेत ,अभिजीत पाटील यांना ताकद देण्यासाठी पाठींबा जाहीर केला आहे.

 यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी पाठींबा देत तालुक्यातील विविध भागातून हा पाठींबा का द्यावा लागला आणि आपल्या शेतकऱ्यांचे भले कोण करू शकतो, हे सांगण्यासाठी गावोगावी सभाही सुरू केल्या आहेत. अशातच रविवारी रयत क्रांती शेतकरी संघटनेने ही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अभिजित पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. यामुळे अभिजित पाटील गटाला वरचेवर अधिकच बळ मिळू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.



 या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, छगन पवार,नंदकुमार व्यवहारे, समाधान साळुंखे,ऋषिकेश पवार, सौरभ गाजरे,बाळकृष्ण बोबडे, प्रदीप कदम, संतोष शेळके, विजय वाघ,विक्रम शेळके, भारत व्यवहारे,प्रकाश व्यवहारे, सागर पवार, आदींसह गावोगावचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad