*राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट देण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
सोलापूर (प्रतिनिधी )
केंद्र सरकार व राज्य सरकार मधील मंत्रिमंडळातील मंत्री महाराष्ट्र राज्यात सभा मेळावे बैठका व दौरे त्याच बरोबर विविध विकासकामाचे उद्घाटन करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रशासकीय कामकाजचा आढावा घेण्यासाठी येत असतात विविध मंत्र्यांच्या बातम्या करण्यासाठी पत्रकारांना आपल्या खाजगी वाहनातून वेगवेगळ्या तालुक्यात व जिल्ह्यात जावं लागत असून वेगवेगळ्या जिल्ह्यात वार्तांकन करण्यासाठी जात असताना पत्रकारांना टोल भरावा लागत आहे महाराष्ट्र राज्य सरकार मधील सर्वच मंत्र्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सचिवालयातील सर्व सचिवांना त्याच बरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर सूट देण्यात आली असून त्याच अनुषंगाने राज्यातील सर्वच पत्रकारांना राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून सुट देण्यात यावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे
यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे संपर्क प्रमुख विश्वनाथ खटावकर शहर प्रसिद्धीप्रमुख अक्षय बबलाद शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) ज्येष्ठ पत्रकार अशोक ढोणे विवेकानंद खेत्री सिद्दिक तांबोळी धर्मराज बारसे युनुस अत्तार हांडे साहेब भागप्पा प्रसन्न रोहित घोडके सुनील खोरेकर इत्यादी पत्रकार उपस्थित होते