एमबीए व एमसीए-सीईटी परीक्षा २०२२ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ
स्वेरी मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमएएच - एमबीए सीईटी आणि एमसीए-सीईटी २०२२ या पद्व्यूत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित मुदत गुरुवार, दि.१७ मार्च २०२२ पासून ते दि. २० एप्रिल २०२२ (रात्री ११.५९) पर्यंत आहे. पदवी उतीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत विद्यार्थ्यांसाठी एमएएच - एमबीए सीईटी आणि एमसीए-सीईटी २०२२ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए विभागात उपलब्ध असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए. आणि एम.सी.ए.च्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्या एमएएच - एमबीए सीईटी २०२२ आणि एमसीए-सीईटी २०२२ या परीक्षा साधारण मे/जून दरम्यान होणार आहेत. सदर परीक्षांसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि. १७ मार्च २०२२ पासून सुरु झाली असून ही प्रक्रिया आता बुधवार, दि. २० एप्रिल २०२२ च्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत चालणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी प्रवेश परीक्षा शुल्क रु.१००० व अनुसूचित जाती-जमातीसाठी रु.८०० एवढे असून हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. या सीईटी परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आयडेंटी साईज एक रंगीत फोटो, एटीएम कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा लॉगीन आयडी आणि त्याचा पासवर्ड या बाबी आवश्यक असणार आहेत. या प्रवेश परीक्षांच्या संदर्भात अधिक माहीतीसाठी एम.बी.ए.चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील (मोबा. नंबर– ९५९५९२११५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.