हनुमान व्यायाम शाळा कुरकुटवाडी योगा शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद ...
प्रतिनिधी. विशाल कुरकुटे संगमनेर
मोफत योग वर्गाचे आयोजन दर शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरकुटवाडी या ठिकाणी करण्यात आले होते. आरोग्य हिच खरी धनसंपदा असे योग शिक्षक गोविंद विठ्ठल कुरकुटे यांनी युवक व युवतींना केले आहे
या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना पूरक व्यायामाबरोबरच विविध प्रकारची आसने शिकविण्यात आली. त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे प्राणायामांचे प्रकारदेखील सादर करण्यात येतील. योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते. शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यासदेखील मदत होते. त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते.
हे शिबिर या आधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरकुटवाडी या ठिकाणी सुरू होते. यानंतर ज्या शिक्षकांनी ही शिबिरे घेण्यास मदत केली मुख्याध्यापिका श्रीमती मंगला रखमाजी राहणे उपाध्यापिका श्रीमती निर्मला लक्ष्मण वाळुंज तसेच शालेय व्यवस्थापन समिती श्री नवनाथ बाळासाहेब कुरकुटे अध्यक्ष श्री गणेश विठ्ठल सहाने उपाध्यक्ष श्री अंकुश बबन कुरकुटे सदस्य श्री सुरेश गणपत कुरकुटे सदस्य श्री सोपान चिमाजी सहाने सदस्य सौ सुलोचना रमेश कुरकुटे सदस्या सौ शितल संतोष दवडे सदस्य सौ शितल गोकुळ कुरकुटे सदस्या सौ रंजना नवनाथ माळी सदस्या यांचे मार्गदर्शन त्यांच्यासाठीदेखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यधामचे गोविद कुरकुटे यांनी दिली. या कार्यक्रमाला साधकांनी व जास्तीत जास्त नागरिकांनी हजर रहावे, असे आवाहन योग शिक्षक गोविंद विठ्ठल कुरकुटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.