पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड* संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज

 *पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड*

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज



 *‘पंढरपूर सिंहगड – गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उज्ज्वल करिअरची विश्वासार्ह वाटचाल!’*

पंढरपूर : प्रतिनिधी

अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटचा ध्यास यामुळे पंढरपूर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील चार विद्यार्थ्यांची पुणे येथील फ्रीस्टीन इन्फोटेक प्रा. लि. या नामांकित आयटी कंपनीत निवड झाली असून, विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज मिळाले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जत येथील कु. प्रज्ञा सुरेश नाईक, नारायण चिंचोली येथील कु. आरती सुहास म्हस्के, पाटकळ (ता. मंगळवेढा) येथील ऋत्विक शिवाजी बनसोडे आणि आटपाडी येथील पांडुरंग सूर्यकांत जाधव यांचा समावेश आहे. कठोर परिश्रम, तांत्रिक कौशल्य आणि महाविद्यालयाच्या प्रभावी प्लेसमेंट प्रशिक्षणाच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी कॅम्पस निवड प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या निवडीची माहिती देताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ पदवीधारक न बनवता उद्योगक्षेत्राच्या गरजा ओळखून ‘इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल’ बनविण्यावर महाविद्यालयाचा विशेष भर आहे.

उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे प्लेसमेंटमध्ये सातत्यपूर्ण यश

विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी पंढरपूर सिंहगडमध्ये प्रथम वर्षापासूनच प्लेसमेंट ओरिएंटेड प्रशिक्षण राबविले जाते. प्रोग्रॅमिंग, तांत्रिक कौशल्ये, कम्युनिकेशन स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, अभियोग्यता चाचण्या, गटचर्चा, मॉक इंटरव्ह्यू, सॉफ्ट स्किल्स आणि करिअर मार्गदर्शन यावर सातत्याने भर दिला जातो.

यासोबतच उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंडस्ट्री व्हिजिट, तांत्रिक कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रत्यक्ष मुलाखतीचा सराव यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची संधी मिळते. परिणामी, महाविद्यालयातील विद्यार्थी विविध नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस ड्राइव्हमध्ये सातत्याने यश संपादन करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी सिंहगडला कंपनीची पसंती:फ्रीस्टीन इन्फोटेक प्रा. लि. ही कंपनी सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी दरवर्षी केवळ पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करते, ही महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्लेसमेंट प्रक्रियेवरील उद्योगविश्वाच्या विश्वासाची पावती मानली जात आहे.

चालू शैक्षणिक वर्षात २१३ हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हसाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला भेट दिली आहे. कंपन्यांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांची कौशल्ये यांचा प्रभावी समन्वय साधत महाविद्यालयाकडून प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठी शिस्तबद्ध तयारी करून घेतली जाते.

‘शिक्षणासोबत कौशल्य आणि कौशल्यासोबत रोजगार’ या ध्येयाने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.

फ्रीस्टीन इन्फोटेक कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडुरू, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. संदीप लिंगे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad