इन्फ्रामॅन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १३६ असंघटित कामगारांना दोन कोटी रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ देवपुष्प फाउंडेशनच्या "इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस प्रेरणा सप्ताह २०२६" अंतर्गत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


📍इन्फ्रामॅन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १३६ असंघटित कामगारांना दोन कोटी रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ


देवपुष्प फाउंडेशनच्या "इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस प्रेरणा सप्ताह २०२६" अंतर्गत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद



सोलापूर : इन्फ्रामॅन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित "इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस प्रेरणा सप्ताह २०२६" अंतर्गत असंघटित कामगारांसाठी दोन कोटी रुपयांच्या विमा संरक्षण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत एकूण १३६ असंघटित कामगारांना विमा संरक्षणाचा लाभ देण्यात आला.



या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा सौ. रोहिणी ताई तडवळकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारा आहे. देवपुष्प फाउंडेशनने राबविलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही अशाच लोकाभिमुख व जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन सातत्याने करावे.


कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुलजी काटकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "मी स्वतः एका कामगाराचा मुलगा असल्याने असंघटित कामगारांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता मला जवळून माहिती आहे. कामगाराला नेहमीच 'आपल्याला काही झाले तर आपल्या कुटुंबाचे काय?' ही काळजी सतावत असते. याच भावनेतून सुरक्षा कवच म्हणून दोन कोटी रुपयांच्या विमा संरक्षणाचा हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला."


ते पुढे म्हणाले की, "इन्फ्रामॅन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे साकारत आहेत. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला सातत्याने लाभावे, त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच प्रत्येक कामगाराची सदिच्छा आणि प्रार्थना असावी."


या कार्यक्रमास बांधकाम क्षेत्रातील मोठ्या संख्येने असंघटित कामगार उपस्थित होते. एकूण १३६ कामगारांना दोन कोटी रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ देण्यात आला.


या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवपुष्प फाउंडेशनचे 

अध्यक्ष -सागर गवळी, सल्लागार -महेश वाघमारे, रोहित परदेशी, शिवानंद हांचनाळ, विवेक भोसले, मनोज भांगे, बबलू गुंगेवाले,तात्यासाहेब भंडारे, प्रभाकर जक्का

 सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतल्याचे आयोजकांनी सांगितले.


चौकट 


सौ. रोहिणी ताई तळवळकर..

 (शहराध्यक्षा, भाजप, सोलापूर शहर) :

"असंघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी देवपुष्प फाउंडेशनने हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. दोन कोटी रुपयांच्या विमा संरक्षणामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. समाजहिताचे असे नावीन्यपूर्ण उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवावेत."


राहुलजी काटकर (संस्थापक अध्यक्ष, देवपुष्प फाउंडेशन) :

"मी स्वतः एका कामगाराचा मुलगा असल्यामुळे कामगारांच्या आयुष्यातील असुरक्षितता जवळून अनुभवली आहे. म्हणूनच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळावी, या भावनेतून हा विमा उपक्रम राबविला. इन्फ्रामॅन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासदृष्टीतून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा संकल्प असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होत राहावा आणि त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे, हीच आमची सदिच्छा आहे."



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad