कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.* प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल

 *कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.*

 प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल



महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पंढरपूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करून उज्जल यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा यावर्षीचा प्रथम वर्ष चा निकाल ८७%  टक्के लागला असून हा निकाल जिल्ह्या अव्वल आहे. यामध्ये प्रथम क्रमांक अंजली जयप्रकाश पटेल  (८०%), व्दितीय क्रमांक मुंढे शिवगंगा गणपत (७८.४०%)  तर तृतीय क्रमांक राजनंदिनी नागनाथ गायकवाड (७६.८०%) यांनी मिळवला आहे. 

 महाविद्यालयाचे शिस्तबद्ध वातावरण, नियमित शिक्षणप्रणाली व अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या विशेष मार्गदर्शनामुळे हे घवघवीत यश मिळाले आहे असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तसेच आपल्या पाल्यांचे या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे सार्थक झाले अशी भावना यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली. बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालयाचे हे दुसरेच वर्ष असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केली आहे  

 श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्रा. गुरुराज कुलकर्णी, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील , पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, वर्गशिक्षक प्रा.सोमेश निकम तसेच सर्व प्राध्यापकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad