सिंहगडच्या श्रेयस अत्रेची ८.४० लाखांच्या पॅकेजवर 'मॅडव्हर्स म्युझिक'मध्ये भरारी!* एस.के.एन. सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या यशाने पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा पंढरपूर : प्रतिनिधी

 *सिंहगडच्या श्रेयस अत्रेची ८.४० लाखांच्या पॅकेजवर 'मॅडव्हर्स म्युझिक'मध्ये भरारी!*

एस.के.एन. सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या यशाने पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा



पंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी श्रेयस राजेंद्र अत्रे याची भारतातील आघाडीची म्युझिक डिस्ट्रिब्युशन आणि प्रमोशन कंपनी मॅडव्हर्स म्युझिकमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदावर वार्षिक ८.४० लाख रुपयांच्या आकर्षक पॅकेजसह निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह पंढरपूर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतातील स्वतंत्र संगीत कलाकार आणि रेकॉर्ड लेबल्सना जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मॅडव्हर्स म्युझिक ही वेगाने प्रगती करणारी कंपनी असून, कलाकारांचे संगीत विविध आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पोहोचविणे, त्यातून उत्पन्न वाढविणे आणि त्यांच्या करिअरच्या विकासासाठी आवश्यक सेवा पुरविण्याचे काम ती करते. श्रेयस अत्रे हे ३ ऑगस्ट २०२६ रोजी कंपनीत रुजू होणार आहेत.

महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना उद्योगजगतासाठी सक्षम बनविण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, एप्टिट्यूड ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, इंडस्ट्री एक्स्पर्ट सेशन्स, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध कौशल्यविकास उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यावसायिक कौशल्ये आणि स्पर्धात्मकता विकसित होत असून त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये उच्च वेतनाच्या नोकरीच्या संधी मिळत आहेत.

श्रेयस अत्रे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, विभागप्रमुख डॉ. शाम कुलकर्णी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.