सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा पोलिस मित्र म्हणून आषाढी वारीमध्ये सहभाग*

 *सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा पोलिस मित्र म्हणून आषाढी वारीमध्ये सहभाग*



पंढरपूर: आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक दाखल होत असताना गर्दी नियोजन, वाहतूक नियंत्रण व भाविकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील स्वयंसेवकांनी २३ जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत 'पोलिस मित्र' म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली.

पंढरपूर शहर पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी भाविकांना योग्य मार्गदर्शन करणे, गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्थापनास मदत करणे, हरवलेल्या व्यक्तींना मदत करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे अशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

या सेवाकार्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. विद्यार्थ्यांच्या कार्यामुळे भाविकांना मोठी मदत झाली असून पोलीस प्रशासनानेही त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून समाजसेवा, राष्ट्रीय कर्तव्य आणि नागरिकांप्रती उत्तरदायित्वाची भावना जोपासण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य "Not Me But You" प्रत्यक्ष कृतीतून साकार करत सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीमध्ये 'पोलिस मित्र' म्हणून बजावलेली सेवा ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.