आषाढी वारीत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा सेवाभाव; हजारो वारकऱ्यांना पुरविली आरोग्यसेवा

 आषाढी वारीत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा सेवाभाव; हजारो वारकऱ्यांना पुरविली आरोग्यसेवा



आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने पायी प्रवास करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा स्तुत्य उपक्रम श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पंढरपूर येथील बी.एस्सी. नर्सिंग व जी.एन.एम. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी राबविला.



वारीच्या कालावधीत हजारो वारकऱ्यांना विविध आरोग्यसेवा देत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यामध्ये वारकऱ्यांचे रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी, थकलेल्या वारकऱ्यांच्या हात-पायांना मसाज करून त्यांना आराम मिळवून देणे, तसेच आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध सेवा विद्यार्थ्यांनी निःस्वार्थ भावनेने दिल्या. या सेवेमुळे वारकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केले.


या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. गुरुराज कुलकर्णी व प्रा. सोमेश निकम, प्रा. ओंकार बागल, प्रा. उत्कर्ष पाटील, प्रा. गणेश दराडे, प्रा. रोहित जगताप, प्रा. रोहित देवकाते, प्रा.नागेश खुपकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

विद्यार्थ्यांनी सेवाभाव, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत केलेल्या या कार्याचे श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच सर्व प्राध्यापकांनी विशेष कौतुक केले.



आषाढी वारीसारख्या धार्मिक आणि सामाजिक सलोखा निर्माण करणाऱ्या सोहळ्यामध्ये भविष्यातील नर्स (परिचार्या) नी दिलेली ही आरोग्यसेवा समाजाप्रती असलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेची आणि सेवाभावी वृत्तीची प्रचिती देणारी ठरली असून याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.