कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे “नो मोबाईल डे” उपक्रम.*

 *कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे “नो मोबाईल डे” उपक्रम.*

 


श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दि. ८ एप्रिल २०२६ रोजी "नो मोबाईल डे" उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात सर्व प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेत मोबाईलचा वापर पूर्णतः टाळला.


या दिवशी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये मोबाईल न आणता आपापसात प्रत्यक्ष संवाद साधला. मोबाईलविना अध्यापनामुळे वर्गातील एकाग्रता वाढली असून विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “डिजिटल साधनांचा योग्य वापर महत्त्वाचा असला तरी त्यावर अवलंबून राहणे टाळणे आवश्यक आहे. ‘नो मोबाईल डे’मुळे मानसिक एकाग्रता व सामाजिक संवाद वाढण्यास मदत होते. तसेच आठवड्यातील प्रत्येक बुधवारी महाविद्यालयातील सर्व घटक "नो मोबाईल" पाळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


या उपक्रमाचे विद्यार्थ्यां व प्राध्यापकांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक व परिणामकारक होत असल्याचे त्यांनी व्यक्त केले. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.