स्वेरी मध्ये ‘पॉवर प्रवाह २०२६’ हा तांत्रिक उपक्रम उत्साहात संपन्न


स्वेरी मध्ये ‘पॉवर प्रवाह २०२६’ हा तांत्रिक उपक्रम उत्साहात संपन्न



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘पॉवर प्रवाह २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.चित्रसेन मैतई यांच्या नेतृत्वाखाली या तांत्रिक उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये ‘अँप्टीक्वीष्ट’ व ‘सर्किट क्लेश’ या स्पर्धांचे आयोजन दि.२३ मार्च २०२६ रोजी करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांमध्ये नवसंकल्पना व तांत्रिक कौशल्य विकसित करण्यासाठी सलग २४ तासांची हॅकेथॉन स्पर्धा देखील दि.२४ मार्च ते दि.२५ मार्च या दोन दिवशी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय चंद्रकांत शिंदे व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर कल्पक देशमुख हे लाभले. त्यांनी आपले विचार व्यक्त करताना ‘अशा परिसंवादामध्ये विद्यार्थी सहभागी झाल्यावर भविष्यात कसा फायदा होणार आहे ? हे सांगितले. याबरोबर अशा परिसंवादाचा विद्यार्थ्यांच्या जडण घडणीमध्ये मोठा वाटा आहे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धांच्या पारितोषक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयईआय सोलापूर लोकल चॅप्टरचे सचिव ओमप्रकाश दरक हे उपस्थित होते. दरक हे एक अनुभवी आर्किटेक्चर व स्ट्रक्चरल इंजिनिअर असून त्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे योगदान आहे. पारितोषिक वितरण प्रसंगी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पुढील वर्षी होणाऱ्या ‘पॉवर प्रवाह २.०’मध्ये असाच सहभाग नोंदवावा असे मत त्यांनी व्यक्त केले. दरक यांनी 'अप्लाईड नॉलेज इज पॉवर’ असा प्रेरणादायी संदेश देत डॉ.बी.पी. रोंगे सरांचे खंबीर नेतृत्व असल्यामुळे अशा प्रकारच्या परिसंवादाचे यशस्वीरीत्या आयोजन होऊ शकते असे सांगत विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व प्रेरणादायी बनविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना बक्षिसे, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत आपले तांत्रिक कौशल्य सादर केले. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. यावेळी स्वेरीचे माजी विद्यार्थी व उद्योजक असलेले श्रेयस पावर सोल्युशनचे संस्थापक श्रेयस कुलकर्णी, स्वेरीच्या परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ.एस. ए. लेंडवे, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी.ए. तंबोळी, प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. ए.ए. मोटे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सागर चौगुले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन सानिका बागल व समीक्षा गटकळ यांनी केले तर विभागप्रमुख डॉ.चित्रसेन मैतई यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad