कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी आंबेडकरांनी उपेक्षितांना हक्क मिळवून देत आधुनिक भारताचा पाया रचला : नागेश फाटे

 कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 


आंबेडकरांनी उपेक्षितांना हक्क मिळवून देत आधुनिक भारताचा पाया रचला : नागेश फाटे 



पंढरपूर/ प्रतिनिधी 


पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग, व्यापार विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे बोलताना म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून, त्यांनी अथक परिश्रम घेऊन जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार केली. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित या संविधानाने उपेक्षितांना हक्क मिळवून देत आधुनिक भारताचा पाया रचला. महान अशा महापुरुषाचे विचार आत्मसात करणे आणि अमलात आणणे सध्याची गरज असल्याचे मत फाटे यांनी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. 


यावेळी सुधाकर बागल, डॉ. रमेश फाटे, प्रकाश गायकवाड, उमेश फाटे, वैभव बागल ,शुभम फाटे, निवृत्ती पाटील, संतोष पुणेकर, ओंकार कटले, समाधान बागल, ऋषी बागल, शरद थिटे, बबन आदमिले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.