महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळीतून समाजाची सुधारणा केली स्वेरीत महात्मा फुले यांची १९९ वी जयंती साजरी



महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळीतून समाजाची सुधारणा केली 

स्वेरीत महात्मा फुले यांची १९९ वी जयंती साजरी



पंढरपूर- ‘समाजातील महिलांची प्रगती व्हावी यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाची सुरवात घरापासून केली. त्यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले. पुढे फुले दाम्पत्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा भिडे वाड्यामधून सुरु केली. तेथून महिलांच्या शिक्षणासाठी अविरत कार्य चालू राहिले. महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळीतून समाजसुधारणेसाठी अविरत कार्य केले त्यामुळे त्यांच्या विचारांनी आजही समाज उजळतो.’ असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी, उद्योजक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुरज मस्के यांनी केले.

        स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) मध्ये थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रेरक आणि जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या १९९ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुरज मस्के हे मार्गदर्शन करत होते. सुरवातीला सिनेट सदस्य सुरज मस्के यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवताना सुरज मस्के पुढे म्हणाले की, ‘थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अनमोल योगदान असून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातून सर्वांना स्फूर्ती मिळते. महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक म्हणून आपण महात्मा फुले यांच्याकडे पाहतो. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन तसेच स्त्रियांना व समाजातील मागास घटकांना शिक्षण देण्याचे महान कार्य त्यांनी अखंडपणे केले. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे.’ असे सांगितले. यावेळी प्रतिक पाटील, सचिन शिंदे, वृषभ आळवेकर, प्रसाद लष्कर, संस्थेचे सचिव डॉ.सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, संस्थेअंतर्गत असलेल्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी.मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पवित्रा बनकर, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एन.ए. तळवलकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.