स्वेरीतील प्राध्यापकांची पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट

 

स्वेरीतील प्राध्यापकांची पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट



पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या चार प्राध्यापकांनी दि. १७ मार्च २०२६ रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अभ्यास दौरा केला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक कौशल्ये व करिअर संधीच्या अनुषंगाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. 

           साखर उद्योगात वापरल्या जाणाऱ्या प्रचलित पद्धती आणि तांत्रिक बाबी याबाबत व्यावहारीक अंतरदृष्टी मिळवणे हा या अभ्यास दौऱ्याचा उद्देश होता. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही जगातील एकमेव संस्था अशी आहे की, ज्यामध्ये साखर उद्योगाशी संबंधित सर्व, वैज्ञानिक, तांत्रिक आणि शैक्षणिक कार्य हे एकाच छताखाली चालते. ही संस्था साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून उद्दिष्ट प्राप्तीसाठी शैक्षणिक विस्तार, संशोधन आणि विकास या तीन मुख्य बाबींवर काम करते. यामुळे या दौऱ्या दरम्यान झालेला अभ्यास हा अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी पडणार आहे. शुगर टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कार्कला गंगाधरम आणि वरिष्ठ शुगर अभियंता डॉ. आण्णासाहेब कोटकर व राजेंद्र भुईटे व सहकार्यांनी स्वेरीतून आलेल्या सर्व प्राध्यापकांचे स्वागत केले. यामध्ये प्राध्यापकांनी त्यांच्याकडून महत्वाच्या बाबी जाणून घेतल्या यामध्ये उसाच्या प्रसंस्करणातील कार्यक्षमता सुधारणे, उत्पादनाच्या नाविन्यपूर्ण अनुप्रयोगावर लक्ष केंद्रित करणे, साखर उत्पादन, कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, विद्युत ऊर्जा जतन करण्याच्या संधी या मुख्य क्षेत्रांचा अभ्यास केला. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांचा सहकार्याने आणि उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजलेल्या या अभ्यास दौऱ्यात स्वेरीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.चित्रसेन मैतई, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.एम. एस. अभिषेक, डॉ. मृणाल कांती रजक, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. आदित्य कुमार अंशू आदी प्राध्यापकांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.