“पी.एम. उषा योजनेअंतर्गत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न”

 *“पी.एम. उषा योजनेअंतर्गत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न”*



पंढरपूर : पी.एम. उषा योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी तज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. वैभव सादिगले, डॉ. विनायक राऊत आणि डॉ. सौ. संगीता पाटील यांनी रक्तदानाचे फायदे, गैरसमज आणि आवश्यक काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नियमित रक्तदान केल्याने समाजातील गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असल्याचे सांगितले आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाने रक्तदानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ७६ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान योग्य वैद्यकीय तपासणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेची सर्व आवश्यक काळजी घेण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख आणि प्रा. सुमित इंगोले तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुराज इनामदार, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. सिद्धेश्वर गणगोंडा आणि प्रा. अजित करांडे यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

तसेच रासयोचे अध्यक्ष अविराज साळुंखे, उपाध्यक्ष बिलाल शेख, सचिव राज नागणे, सहसचिव संकेत खडतरे, खजिनदार ओंकार पुजारी, सोशल मीडिया ऑपरेटर विजय पवार आणि स्वयंसेवक प्रविण नागटिळक, वैभव व्यवहारे, प्रणव जाधव, ओम पवार, पुर्वा वाखरकर, स्नेहा कदम, अमृता फुले, वैष्णवी देवकर, सानिया मुल्ला, रेष्मा पठाण यांनीही या शिबिरासाठी मोलाचे योगदान दिले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागली असून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.