सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सांख्यिकी तंत्रांचे महत्त्व अधोरेखित करणारा एकदिवसीय शैक्षणिक सेमिनार संपन्न

 *सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सांख्यिकी तंत्रांचे महत्त्व अधोरेखित करणारा एकदिवसीय शैक्षणिक सेमिनार संपन्न*




शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी “इम्पॉर्टन्स ऑफ स्टॅटिस्टिकल टेक्निक्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग” या विषयावर एकदिवसीय शैक्षणिक सेमिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सेमिनारचे प्रमुख वक्ते मा. श्री. ओंकार एस. बिडकर हे होते.

हा सेमिनार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सेमिनाराची सुरुवात करण्यात आली.

आपल्या व्याख्यानात श्री. ओंकार एस. बिडकर यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात सांख्यिकी तंत्रांचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. डेटा विश्लेषण, गुणवत्ता नियंत्रण, संरचनात्मक सुरक्षितता, वाहतूक अभियांत्रिकी, जलसंपदा व्यवस्थापन तसेच संशोधन कार्यात सांख्यिकी पद्धतींचा प्रभावी वापर कसा केला जातो, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रकल्पांतील उदाहरणांच्या आधारे विद्यार्थ्यांना सांख्यिकी तंत्रांचा व्यावहारिक उपयोग स्पष्ट करण्यात आला.

आधुनिक स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये योग्य निर्णय प्रक्रियेसाठी सांख्यिकी तंत्रे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी अशा शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करावा, असे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी यांनी तांत्रिक शिक्षणात सांख्यिकी विषयाचे वाढते महत्त्व स्पष्ट केले, तर विभागप्रमुख डॉ. एस. एस. कदम यांनी सेमिनार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त असल्याचे नमूद केले.

या सेमिनारला स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.