स्वेरीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी


स्वेरीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरा करण्यात आली. त्या सोबतच ‘संकल्प विद्यार्थी क्लब’चे उदघाटन आणि लोगो अनावरण हे ही कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एबीएलइएस इंडिया चे संस्थापक अमोल दिक्षित हे लाभले होते. 

      सुरवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संकल्प विद्यार्थी क्लबचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी क्लबची संकल्पना व उद्दिष्टे याबाबत सविस्तर माहिती दिली. क्लब अंतर्गत पीएलसी-स्काडा, पायथॉन, लॅटेक्स, एचटीएमएल, सीएसएस यांसारखे विविध तांत्रिक कोर्सेस विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा क्लब ज्ञानप्रसाराचा मंच असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमांतर्गत इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी द्वितीय वर्ष व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना आपले ज्ञान व कौशल्ये याबाबत माहिती देणार आहेत. संकल्प क्लबच्या लोगोच्या अंतिम निवडीसाठी आयोजिलेल्या स्पर्धेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या रिद्धी कुर्डे या विद्यार्थिनीने केलेला लोगो अंतिम म्हणून स्वीकारण्यात आला. प्रमुख पाहुणे अमोल दीक्षित यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. त्यानंतर डॉ. यशपाल खेडकर यांनीही नेताजींच्या कार्यावर प्रकाश टाकला. उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी संकल्प विद्यार्थी क्लब या उपक्रमाचे कौतुक करून हा क्लब भविष्यातही यशस्वीपणे कार्यरत रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, उप- विभागप्रमुख प्रा.महुआ बिस्वास, संकल्प विद्यार्थी क्लबच्या समन्वयक प्रा. प्राजक्ता तुपारे, तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विभागप्रमुख डॉ. नीता कुलकर्णी- तळवलकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.