पंढरपूर सिंहगडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची १० मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प व ६२० व्होल्ट / ३३ किलो व्होल्ट जनरेटिंग सबस्टेशनला भेट

 पंढरपूर सिंहगडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची १० मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प व ६२० व्होल्ट / ३३ किलो व्होल्ट जनरेटिंग सबस्टेशनला भेट



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकीमधील दुसऱ्या वर्षातील विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची १० मेगा वॅट आर वाई बी इलेक्ट्रिकल पॉवर प्रायव्हेट लिमिटेड,, आणि ६२० व्ही/३३ केव्ही जनरेटिंग सबस्टेशन, पोस्ट.सोनलवाडी , ता. सांगोला, जिल्हा.सोलापूर, येथे शनिवार दिनांक. २४ जानेवारी २०२6 रोजी भेट देऊन माहिती जाणून घेतली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


या भेटीमध्ये सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना, मुख्य घटक आणि कामकाजाची माहिती मिळवली, तसेच ६२० व्ही / ३३ केव्ही सबस्टेशनची निर्मिती आणि सबस्टेशनचे काम, वेगवेगळ्या विद्युत उपकरणांचा प्रोटेक्शनसाठी वापर, विद्युत सेवा वेगवेगळ्या क्षेत्रात कशी विभागणी करून पोहचवली जाते व बॅटरी स्टोरेज सिस्टीम याविषयीची माहिती तसेच विविध इन्स्टॉलेशन विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासाठी आर. वाई. बी. इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेडचे अभियंता श्री.चंद्रकांत चोरमले प्लांट इनचार्ज, यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना आणि कामकाजाचे तपशीलवार वर्णन केले. तसेच ६२० व्ही / ३३ केव्ही सबस्टेशनचे कार्य आणि नियंत्रण याचेही तपशीलवार वर्णन केले.


हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील विद्युत विभाग प्रमुख के. शिवशंकर, आय व्ही समन्वयक प्रा. अंजली चांदणे , प्रा. के. पी. जाधव, प्रा. एन. व्ही. खांडेकर, प्रा.ए. आर. मासाळ आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad