एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे एंजेल इन्व्हेस्टमेंट व व्हेंचर कॅपिटल फंडिंग संधींवर मार्गदर्शन सत्र संपन्न

 एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे एंजेल इन्व्हेस्टमेंट व व्हेंचर कॅपिटल फंडिंग संधींवर मार्गदर्शन सत्र संपन्न



पंढरपूर (प्रतिनिधी) :

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील उद्योजकता विकास कक्ष व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने “एंजेल इन्व्हेस्टमेंट व व्हेंचर कॅपिटल फंडिंग संधी” या विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. नंदकुमार दुपडे (प्रेरणादायी वक्ते व माजी तज्ज्ञ, एमसीइडी) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप संकल्पना, उद्योग उभारणीसाठी आवश्यक भांडवल, एंजेल गुंतवणूकदार व व्हेंचर कॅपिटल फंडिंग मिळविण्याच्या प्रक्रिया, तसेच व्यवसायातील संधी व आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयआयसी अध्यक्ष, डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दत्तात्रय कोरके आयआयसी उपाध्यक्ष तसेच प्रा. महेश झाडे, प्रा. लक्ष्मीकांत जोशी व प्रा.प्रदीप व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

या सत्राला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व नवोपक्रमाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रीया जोशी व रियान बागवान यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी हे मार्गदर्शन सत्र यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.