एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी व आर्थिक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

 एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी व आर्थिक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न



पंढरपूर (प्रतिनिधी) :

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील उद्योजकता विकास कक्ष व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने “स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी व आर्थिक व्यवस्थापन” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. नंदकुमार दुपडे (प्रेरणादायी वक्ते व माजी तज्ज्ञ, एमसीईडी) उपस्थित होते. त्यांनी स्टार्टअप सुरू करताना आवश्यक असलेली आर्थिक नियोजन प्रक्रिया, गुंतवणूकदारांकडून निधी मिळविण्याच्या संधी, व्यवसाय आराखडा, खर्च नियंत्रण, नफा-तोटा विश्लेषण तसेच शाश्वत आर्थिक व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा दिली.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयआयसी अध्यक्ष, डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दत्तात्रय कोरके आयआयसी उपाध्यक्ष तसेच प्रा. महेश झाडे, प्रा. लक्ष्मीकांत जोशी व प्रदीप व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

या कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप व नवोपक्रमाविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांना उद्योगजगताची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्रीया जोशी व रियान बागवान यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी ही कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.