जेईई (मेन) २०२६ सेशन- २ च्या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु दि. २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार प्रक्रिया


जेईई (मेन) २०२६ सेशन- २ च्या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु

दि. २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार प्रक्रिया




पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये डिग्री इंजिनिअरींगला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या व भारत सरकारच्या उच्चतर शिक्षण विभाग, मंत्रालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘जेईई (मेन) २०२६ सेशन- २’ या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रविवार, दि.०१ फेब्रुवारी २०२६ पासून ते बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार असून ही परीक्षा गुरुवार, दि.०२ एप्रिल २०२६ ते गुरुवार, दि. ०९ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.

    प्रथम वर्ष इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या 'जेईई (मेन) २०२६ च्या सेशन- २' या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची मुदत रविवार, दि.०१ फेब्रुवारी २०२६ पासून ते बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दिली आहे. सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी सदर फॉर्म भरण्यासाठी येताना आपल्या प्रवर्गानुसार आवश्यक असणारी फॉर्म फी आणि आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. जेईई (मेन) फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याना आधार कार्ड, आयडेंटी आकाराचा रंगीत फोटो, एटीएम कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा लॉगीन आयडी आणि त्याचा पासवर्ड, ओटीपी करिता मोबाईल या महत्वाच्या बाबी आवश्यक असणार आहेत. याबाबत शासनाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी प्रा. उत्तम अनुसे (मोबा.-९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad