पंढरपूर सिंहगडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियंत्यासाठी करिअर संधीवर व्याख्यान

 *पंढरपूर सिंहगडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियंत्यासाठी करिअर संधीवर व्याख्यान*



पंढरपूर : प्रतिनिधी

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी “करिअर ऑपर्च्युनिटीज इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नेहा रोकडे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. व्याख्यानादरम्यान नेहा रोकडे यांनी इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील विविध करिअर संधी, उद्योगातील सध्याच्या व भविष्यातील संधी, तसेच विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाची तांत्रिक कौशल्ये, सांघिक कामकाजाचे महत्त्व आणि इंडस्ट्रीच्या अपेक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी आवश्यक दिशा व प्रेरणाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेहा रोकडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विभागातील प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. स्वप्निल टाकळे, प्रा. सोनाली गोडसे यांच्यासह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.