पंढरपूरच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टेक्नोझील 2K26’ राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव उत्साहात संपन्न* पंढरपूर : प्रतिनिधी

 *पंढरपूरच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टेक्नोझील 2K26’ राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव उत्साहात संपन्न*



पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे ‘टेक्नोझील 2K26’ हा राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्य, नवकल्पनांची आवड, सर्जनशील विचारसरणी व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी, एसीएसईएस समन्वयक श्री. सुमीत इंगोले, प्रा. नामदेव सावंत, डॉ. विनायक जगताप, श्री. बाळकृष्ण जगदाळे, एसीएसईएस अध्यक्ष श्री. कुलदीप गोडसे, उपाध्यक्ष श्री. पृथ्वीराज गायकवाड तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टेक्नोझील हा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारा एक नाविन्यपूर्ण तांत्रिक मंच असून, याद्वारे संगणक अभियांत्रिकी तसेच माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आधुनिक संकल्पनांचा अनुभव घेण्याची संधी मिळते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कोडिंग, समस्या सोडविणे, तांत्रिक सादरीकरण, विश्लेषणात्मक विचार तसेच संघभावना विकसित करण्यासाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते.

टेक्नोझील 2K26 अंतर्गत कोड स्प्रिंट, क्लू चेस, टेक फ्रेम तसेच गेम फेस्ट (बीजीएमआय व लुडो) अशा विविध तांत्रिक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये सिंहगड महाविद्यालयासह राज्यातील विविध महाविद्यालयांमधील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कौशल्ये सादर केली. 

टेक्नोझील हा केवळ स्पर्धांचा संच नसून, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी, करिअर घडविण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण विचारांना चालना देणारा एक प्रभावी तांत्रिक मंच आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी समन्वयकांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधत विशेष परिश्रम घेतले. स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, चषक व रोख पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad