*एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन साजरा*

 *एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन साजरा*



पंढरपूर प्रतिनिधी :

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी-पंढरपूर येथे राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम मराठवाडा प्रवेगक विकास व उद्योजकता संवर्धन परिषद यांच्या सहकार्याने संमिश्र (हायब्रिड) पद्धतीने पार पडला. “संकल्पनेपासून परिणामापर्यंत – दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीविषयी संवाद” या विषयावर आयोजित सत्रात मिलो ड्राइव्ह या संस्थेचे सहसंस्थापक श्री. मोनिल खत्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हे सत्र दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत मॅजिक लर्ननेक्स्ट या ऑनलाईन शिक्षण मंचावर घेण्यात आले.

या सत्रामध्ये स्टार्ट-अपची संकल्पना, कल्पना प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतरित करण्याची प्रक्रिया, गुंतवणूक मिळविण्याच्या संधी, तसेच नवउद्योजकांसमोरील आव्हाने याबाबत सखोल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमास महाविद्यालयातील ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयी जागरूकता वाढली असून नवकल्पना, तांत्रिक कौशल्ये आणि सादरीकरण क्षमता विकसित होण्यास मदत झाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप इकोसिस्टमची समज वाढली असून उद्योजकता ही करिअरची एक प्रभावी संधी असल्याची जाणीव निर्माण झाली. एकूणच हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष / उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. अतुल आराध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad