सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन विभागामध्ये “इंटिग्रेटेड सर्किट्स: रचना, संकल्पना आणि प्रत्यक्ष कार्यप्रणाली” विषयावर कार्यशाळा संपन्न*

 *सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन विभागामध्ये “इंटिग्रेटेड सर्किट्स: रचना, संकल्पना आणि प्रत्यक्ष कार्यप्रणाली” विषयावर कार्यशाळा संपन्न*



पंढरपूर (प्रतिनिधी): एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी दि. २१ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी “इंटिग्रेटेड सर्किट्स : रचना, संकल्पना आणि प्रत्यक्ष कार्यप्रणाली” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून एन. बी. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव-सोलापूर येथील ईएनटीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एस. शिरगन उपस्थित होते. त्यांनी अॅनालॉग सर्किट डिझाईनची मूलतत्त्वे, डिझाईन करताना विचारात घ्यावयाचे महत्त्वाचे घटक, सर्किटचे तांत्रिक विश्लेषण तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अॅनालॉग इंटिग्रेटेड सर्किट्सचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना डॉ. शिरगन यांनी स्पष्ट केले की, कोणतीही डिजिटल प्रणाली प्रभावीपणे कार्य करण्यासाठी अॅनालॉग सर्किट्सची भक्कम साथ आवश्यक असते. सेन्सर्समधून प्राप्त होणारे सिग्नल्स, ऑडिओ-व्हिडिओ प्रोसेसिंग, पॉवर मॅनेजमेंट, कम्युनिकेशन सिस्टिम्स तसेच वैद्यकीय उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये अॅनालॉग आयसींचा व्यापक वापर होत आहे.

मोबाइल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने, औद्योगिक ऑटोमेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) उपकरणांमध्ये अॅनालॉग व मिक्स्ड-सिग्नल सर्किट्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कमी उर्जा वापर, उच्च कार्यक्षमता, सिग्नलची अचूकता व विश्वसनीयता या बाबींमध्ये अॅनालॉग डिझाईनचे महत्त्व विशेष आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्रात कुशल अॅनालॉग डिझायनर्सची मागणी सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच व्हीएलएसआय उद्योगातील झपाट्याने होणारी प्रगती, उदयोन्मुख तंत्रज्ञानातील बदल, चिप डिझाईन क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच संशोधन व विकास (आर अँड डी) क्षेत्रातील विविध वाटा याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. उद्योगाभिमुख कौशल्ये, सॉफ्टवेअर टूल्सचे ज्ञान, सर्किट सिम्युलेशन व प्रोजेक्ट आधारित शिक्षण यांचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले.

कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदवला, त्यामुळे कार्यक्रम अधिक ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.

या उपक्रमाचे आयोजन इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सचे समन्वयक प्रा. वैभव गोडसे, विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. वैष्णवी उत्पात यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच प्रा. अंजली पिसे, प्रा. स्वप्निल टाकळे व श्री. आशिष येडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. वैष्णवी उत्पात यांनी केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना अॅनालॉग आयसी डिझाईन व व्हीएलएसआय क्षेत्रातील संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले असून त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीस निश्चितच चालना मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad