*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या सृजनरंग स्पर्धेत सिंहगड अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरीय पारितोषिके*

 *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या सृजनरंग स्पर्धेत सिंहगड अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरीय पारितोषिके*




कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरीय नियतकालिक स्पर्धा-सृजनरंग मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांमधील लेखक, कवी आणि विचारवंत घडावेत तसेच त्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विद्यापीठस्तरावर सृजनरंग नियतकालिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये आपली नियतकालिके पाठवितात. तज्ज्ञांकडून मूल्यमापन झाल्यानंतर विजेत्यांची निवड जाहीर केली जाते.

सन २०२४-२५ च्या निकालानुसार, सिंहगड अभियांत्रिकीच्या अद्विक-२०२५ या नियतकालिकाला विविध साहित्यप्रकारांमध्ये चार पारितोषिके मिळाली आहेत. इंग्रजी भाषा ललित गद्यात्मक लेखनासाठी वैष्णव कुलकर्णी याला प्रथम पारितोषिक, तसेच भारतीय भाषा संस्कृत वैचारिक लेखनासाठी प्रगती कोरे हिला द्वितीय पारितोषिक, तसेच चित्रकला विभागात प्रियांका जाधव हिला द्वितीय पारितोषिक, व मराठी भाषा काव्यात्मक लेखनासाठी रुपाली बोडरे हिला तृतीय पारितोषिक मिळाले. पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी प्रशांत मोरे, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक व प्र-कुलसचिव यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रकाशन विभागाचे अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख, सह-संपादक डॉ. दिपक गानमोटे तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.