पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये "रोबोटिक्स अवेअरनेस प्रोग्राम" यशस्वीपणे पार पडला*

 *पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये "रोबोटिक्स अवेअरनेस प्रोग्राम" यशस्वीपणे पार पडला*



पंढरपूर (प्रतिनिधी) : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी येथे दिनांक ५ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी, २०२६  दरम्यान संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी , यांत्रिकी अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग आणि विद्युत  अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातील इ-यंत्र क्लब च्या वतीने "रोबोटिक्स अवेअरनेस प्रोग्राम" चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कु. प्रतीक कुलकर्णी (अध्यक्ष, ई-यंत्र क्लब) आणि कु. रवी अनण (उपाध्यक्ष, ई-यंत्र क्लब) यांनी सहभाग घेतला. यांनी विद्यार्थ्यांना रोबोटिक्स विषयी प्राथमिक माहिती देत त्यांनी रोबोट डिझाईन, प्रोग्रॅमिंग, अॅप्लिकेशन तयार करणे, हार्डवेअर वापर आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती नव्याने जाणून घेण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी श्री. उदयकुमार फुले, श्री. अनिल जाधव, श्री. राहुल घोडके, सौ. सोनाली घोडके व विध्यार्थी प्रतिनिधी कु. प्रतीक कुलकर्णी आणि कु. रवी अनण यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.