सिंहगड पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची बांधकाम स्थळास अभ्यास भेट*

 *सिंहगड पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची बांधकाम स्थळास अभ्यास भेट*



पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी तृतीय वर्ग वर्षातील विद्यार्थ्यांसाठी बांधकाम स्थळास “डिझाईन ऑफ काँक्रीट स्ट्रक्चर, प्रोजेक्ट अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, कन्स्ट्रक्शन सेफ्टी (बांधकाम सुरक्षा)” या विषयांच्या अनुषंगाने ही भेट नियोजित करण्यात आली होती.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. स्ट्रक्चरल डिझाईननुसार सळई बांधणी, शटरिंग, काँक्रीट टाकण्याची पद्धत, गुणवत्ता नियंत्रण चाचण्या तसेच बांधकामातील सुरक्षा उपाययोजना यांची सविस्तर माहिती तज्ज्ञ अभियंत्यांकडून देण्यात आली. तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने कामाचे नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन, वेळापत्रक नियंत्रण आणि खर्च नियंत्रण या बाबींचेही मार्गदर्शन करण्यात आले.

बांधकाम सुरक्षा नियमांचे पालन, कामगारांसाठी आवश्यक वैयक्तिक सुरक्षा साधनांचा ( पीपीई) वापर, उंचीवरील कामासाठी घेण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांचे सैद्धांतिक ज्ञान अधिक दृढ होऊन प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे नियोजन करण्यात आले. प्रा. गणेश लकडे, प्रा. अमोल कांबळे, प्रा. मिलिंद तोंडसे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या अभ्यास भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करून अशा प्रकारच्या अधिकाधिक औद्योगिक व बांधकाम स्थळ भेटींचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या अभ्यास भेटीमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सुरक्षा जाणीव यांची महत्त्वपूर्ण जाणीव झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.