पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागात “नूतनीकरणीय ऊर्जा” विषयावर मार्गदर्शन*

 *पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागात “नूतनीकरणीय ऊर्जा” विषयावर मार्गदर्शन*



पंढरपूर | प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी द्वितीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी “नूतनीकरणीय ऊर्जा” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विभागाचे माजी विद्यार्थी आणि स्पार्टन सोलार टेक्नॉलॉजी, मंगळवेढा चे संस्थापक इं. सुरज डोके होते. त्यांनी नूतनीकरणीय ऊर्जा, विशेषतः सौरऊर्जा, पवनऊर्जा, जलऊर्जा आणि बायोमास ऊर्जा यांचे तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.

सुरज डोके यांनी नूतनीकरणीय ऊर्जा ही पर्यावरणपूरक ऊर्जा असून तिचा स्त्रोत नैसर्गिक असून सतत मिळणारी ऊर्जा आहे, अशी माहिती दिली. त्यांनी सांगितले की सौर, पवन, जल, बायोमास आणि भू-ऊष्मा यांचा वापर पारंपरिक जीवाश्म इंधनावर अवलंबित्व कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकास साधण्यासाठी होतो.

व्याख्यानात सौरऊर्जा तंत्रज्ञानातील सौर पॅनेल्स, इन्व्हर्टर, बॅटरी स्टोरेज, सौरऊर्जा प्रणालींचे डिज़ाइन आणि कार्यप्रणाली यांचा समावेश कसा होतो, हे सविस्तर समजावून सांगितले. तसेच सौरऊर्जा क्षेत्रातील अभियांत्रिकी, संशोधन, देखभाल, व्यवसाय व उद्योजकतेच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सुरज डोके यांनी स्वतःच्या उद्योजकीय प्रवासाचा अनुभव शेअर करून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख दृष्टीकोन विकसित करण्याचे आवाहन केले. 

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. धनंजय आर. गिराम यांनी अतिथींचे स्वागत करून व्याख्यानाबद्दल आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद जी. कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना नूतनीकरणीय ऊर्जा, शाश्वत तंत्रज्ञान, सौरऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञान, व्यवसाय व उद्योजकता याबाबत उपयुक्त माहिती मिळाली असून त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी नवे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.