एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात मृदा सुधारणा तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे व्याख्यान*

 *एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात मृदा सुधारणा तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे व्याख्यान*



पंढरपूर :

 एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व इंडियन जिओ टेक्निकल सोसायटी (आय जी एस) स्टुडंट्स चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी  सॉईल इम्प्रूमेंट टेक्निक्स  (मृदा सुधारणा तंत्रज्ञान) या विषयावर  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

 या कार्यक्रमासाठी प्रख्यात तज्ज्ञ डॉ. संदीप माळी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात डॉ. माळी यांनी मृदेची वहन क्षमता वाढविणे, मृदा स्थिरीकरण पद्धती, जिओसिंथेटिक्सचा वापर, तसेच प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातील अनुप्रयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यामुळे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

महाविद्यालयाचे डीन डॉ. चेतन पिसे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी अशा तांत्रिक कार्यक्रमांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. सत्यवान जगदाळे यांच्या समवेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.