पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची लांबोटी येथील ४०० केव्ही महावितरण उपकेंद्राला औद्योगिक भेट*

 *पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची लांबोटी येथील ४०० केव्ही महावितरण उपकेंद्राला औद्योगिक भेट*



पंढरपूर (प्रतिनिधी) – कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विद्युत अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत येणाऱ्या ४०० केव्ही उपकेंद्र, लांबोटी येथे शैक्षणिक व औद्योगिक भेट दिली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या औद्योगिक भेटीमध्ये विद्यार्थ्यांना उपकेंद्राचे कार्यप्रणाली, विविध विद्युत उपकरणांचे संरक्षण व्यवस्थापन, विद्युत ऊर्जा वितरणाची प्रक्रिया, बॅटरी स्टोरेज प्रणाली तसेच उपकेंद्रातील विविध इन्स्टॉलेशन्स याविषयी सखोल माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, लांबोटी येथील सहाय्यक अभियंता श्री. सुरेश रेड्डी यांनी उपकेंद्रातील नियंत्रण प्रणाली, देखरेख, सुरक्षा व्यवस्था यांचे तपशीलवार सादरीकरण केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. के. शिवशंकर, आय.व्ही. समन्वयक प्रा. अमोल गोडसे, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. सोनाली घोडके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad