प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दि. १६ ऑगस्ट पासून तिसऱ्या कॅप फेरीत पहिले सहा क्रम हे ऑटोफ्रीज असणार


प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दि. १६ ऑगस्ट पासून

तिसऱ्या कॅप फेरीत पहिले सहा क्रम हे ऑटोफ्रीज असणार



पंढरपूरः 'शै.वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीचा विचार केला असता नेहमीप्रमाणे या ही वर्षी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थी व पालकांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थांची संख्या, शैक्षणिक व संशोधनाचे वातावरण, मिळालेली मानांकने, उपलब्ध सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसत आहे. असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांना चुकीचे निर्णय, अयोग्य ब्रँचची निवड व सीईटीचा स्कोअर, गुंतागुंतीचे नियम यामुळे स्वेरी महाविद्यालय मिळाले नाही असे असताना विद्यार्थ्यांना शनिवार, दि. १६ ऑगस्ट ते सोमवार दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या तिसऱ्या कॅप राउंड द्वारे संधी उपलब्ध झाली आहे.’ असे प्रतिपादन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. करण पाटील यांनी केले.

         पहिल्या व दुसऱ्या कॅप राऊंड नंतर स्वेरीमध्ये फारशा जागा शिल्लक राहत नाहीत हा इतिहास आहे. याच पार्श्वभूमीवर स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. 'शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशाची तिसरी फेरी (थर्ड कॅप राऊंड) चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया येत्या शनिवार, दि. १६ ऑगस्ट ते सोमवार दि.१८ ऑगस्ट २०२५ हे तीन दिवस चालणार आहे. ज्यांना पहिल्या फेरीत व दुसऱ्या प्रवेश मिळाला नाही व ज्यांनी दुसऱ्या फेरीत नॉट फ्रीझ/ बेटरमेन्ट केले आहे त्यांना या तिसऱ्या फेरीचा लाभ घेता येणार आहे. तिसऱ्या कॅप फेरीत पहिले सहा क्रम हे ‘ऑटोफ्रीज’ असणार आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. सन २०२५-२६ च्या पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रियानंतर पहिल्या व दुसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसरी फेरी झाल्यावर देखील योग्य महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच मिळाली नसेल अथवा कुठेच प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या फेरीतून संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे योग्य महाविद्यालय व योग्य ब्रँच याबाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी मागे झालेल्या चूका टाळून व कट ऑफचा पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-३ चे ऑप्शन फॉर्म भरणे आवश्यक आहे. ‘पालक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, कॅम्पस मधून मिळणारे संस्कार, शैक्षणिक वातावरण, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीच्या जागावाटप (अलॉटमेंट) नंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शुक्रवार, दि.२२ ऑगस्ट ते सोमवार, दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी दु. ३:०० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागेल. स्वेरी अभियांत्रिकीच्या स्क्रुटनी सेंटर (एस.सी.क्रमांक-६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सोय केली असून प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वेरी महाविद्यालय सज्ज झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad