कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

 कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा



पंढरपूर / प्रतिनिधी 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी शेळवे पंढरपूर येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एक राष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देणारा आज चा दिवस असून या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तन, मन, आणि धनाने बलिदान दिलेल्या शुर वीरांचे स्मरण करण्याचा दिवस आहे असे सांगून त्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना जागृत केली. आपण करीत असलेले काम प्रामाणिकपणे करून सर्व कर्तव्ये बजावणे हीच भारत मातेची सेवा आहे असेही त्यांनी सांगितले. भारताला शक्तिशाली बनविण्याचे सामर्थ्य हे तरुणांमध्ये असून प्रत्येकानी एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे सांगून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य प्रा. गुरुराज कुलकर्णी, फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सचिन जाधव, सायन्स कॉलेजचे प्राचार्या प्रा. एम आर पाटील तसेच कर्मयोगी इन्स्टिट्यूट अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारताला प्लास्टिक मुक्त करण्याची शपथ सर्वांनी घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.