*पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची मलशुद्धीकरण केंद्रास भेट*
पंढरपूर: प्रतिनीधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी गोपाळपुर (ता.पंढरपूर) येथील मलशुद्धीकरण केंद्रास सदिच्छा भेट दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
नागरिकांनी वापरलेल्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी नदी, नाल्यात सोडण्यास प्रमाणित केले जाते. दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य, औद्योगिक प्रत उच्च दर्जाची राहते असे दुषित पाणी मलशुद्धीकरण माध्यमातून शुद्धीकरण करून नदीत सोडले जाते.
गोपाळपुर येथील मलशुद्धीकरण केंद्राला एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन पंढरपूर मधला सर्व सांडपाणी गोपाळपूरच्या पायथ्याला जमा करून ग्रॅव्हिटीने तिथून लिफ्ट करून मंदिराच्या पाठीमागे ट्रि टमेंट प्लॉट आहे. सदर सांडपाण्यावरती ऑक्सिजनचा पुरवठा करून त्याचे शुद्धीकरण करून पुन्हा नदीत सोडले जाते. हे कसे शुद्धीकरण केले जाते याबाबतची सर्व माहिती सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी मलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन घेतली.
हि भेट यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम याच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये
प्रा. चंद्रकांत देशमुख सह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.