*पंढरपूर सिंहगड संशोधनातही अव्वल- डाॅ. भालचंद्र गोडबोले*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालय गेली दहा-बारा वर्ष विद्यार्थ्यांसोबत तंत्रज्ञान संशोधन आणि त्याचे समाजातील विविध घटकांना उपयोग होण्यासाठी साधनांची निर्मिती होत आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयातील शिक्षकांसोबत विविध अभियांत्रिकी शाखांचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी या संशोधनात प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रेसर भुमिका बजावत
आहेत.
संशोधन आणि नवनिर्मिती हे व्यावसायिक शिक्षणाचे अविभाज्य अंग आहे. ज्या संस्थांमध्ये शैक्षणिक कार्याबरोबरच नवनिर्मिती ( product design) आणि संशोधन होते. त्यांचा सामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा मोलाचा वाटा असतो. पंढरपूरचे सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज सुरुवातीपासूनच या पैलूकडे सातत्यपूर्ण आणि प्रयत्न पूर्वक भर देत आहे. त्याची परिणिती म्हणून आज पर्यंत महाविद्यालयाने स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखणण्यासारखेच यश संपादन केले आहे.
सध्या महाविद्यालयाच्या संशोधन आणि विकासविभागामार्फत विविध पेटंटस् वर काम चालू आहे. तर बऱ्याच संशोधनांचे स्वामित्व हक्क प्राप्त केले आहेत. एवढेच नाही तर अनेक संशोधन प्रकल्प ( Research Projects) राष्ट्रीय संशोधन संस्थाकडून मिळवून यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. महाविद्यालयात कृषी संबंधी सौर ऊर्जा आधारित साधन-अवजार निर्मिती संशोधन चालू असून अपारंपारिक ऊर्जा व संगणक संबंधी नवीन ॲपची निर्मिती सुद्धा प्रगतीपथावर आहे.
महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या तंत्रशाखांच्या विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन निर्मिती, सोलर व्हेईकल्स, जलस्रोत, आणि पाणी शुद्धीकरण तसेच वारीतील सामान्य वारकऱ्यांसाठी "पंढरीची वारी नावाने वारी ॲप" निर्मिती केली आहे. वेगवेगळ्या संरक्षण शस्त्रांसाठी मटेरियलची निर्मिती महाविद्यालयात होत आहे. सध्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी डीआरडीओ या राष्ट्रीय संरक्षण संशोधन संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत.
महाविद्यालयात स्वतंत्र संशोधन व विकास विभाग असून या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना संशोधन संकुलात प्रशिक्षण आणि संशोधन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल्स आणि काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग शाखांमध्ये आजवर लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त करून संशोधन प्रकल्प, संशोधन पेटंट व शोधनिबंध त्यांचे स्वामित्व हक्क मिळवून यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. संशोधन आणि समाजोपयोगी यांत्रिक-तांत्रिक साधनांचा विकासाचा आलेख सालोसाल चढताच राहिला आहे. त्यासाठी अनुदान देण्याच्या संस्थांबरोबरच पंढरपूरच्या सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील शिक्षक, शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत.