पंढरपूर सिंहगड मध्ये शिवजयंती सामाजिक उपक्रमाने साजरी*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये शिवजयंती सामाजिक उपक्रमाने साजरी*



पंढरपूर: प्रतिनिधी 


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते. याच अनुषंगाने सिंहगड महाविद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.



  १९ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन प्राचार्य कैलाश करांडे, प्रा. सुमित इंगोले, प्रा.नामदेव सावंत, प्रा. अतुल आराध्ये, प्रा.शिवाजी पवार, अविनाश वाघमारे, एनएसएस क्लबचे प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 सालाबाद प्रमाणे याही वर्षी सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून हिरा प्रतिष्ठान विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प पालवी या ठिकाणी जाऊन तेथील मुलांना विविध फळांचे वाटप करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त वृक्ष संवर्धनाचा संदेश देऊन वृक्षारोपण करण्यात आले.

  हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, रासेयो समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, यासह एनएसएस क्लबचे प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, सेक्रेटरी अथर्व कुराडे विभागीय विद्यार्थी प्रतिनिधी नाना वाघमारे, किशोर नरळे, आकाश चौगुले, श्रद्धा पंधे, आनुप नायकल, प्राप्ती रुपनर, तेजस्वी खाांडेकर, चेतन मासाळ, राशिद पठाण, सत्यम कापले, वैष्णवी कंडरे, हर्षद शिंदे, सुमित अवताडे, वैष्णवी पडगळ, आकांक्षा कवडे, प्रणव देवराम, साक्षी भिवरे, यासह यश लोंढे, स्वप्नील शेंडे, सुमेध शेडगे, रोहन कोपनर, सोहम नवले, अनिल चव्हाण, चंद्रकांत घोळवे, गणेश तानवडे, उदयराज भोसले, महेश भोसले, प्रदीप नरळे, विश्वजीत शिंदे,स्वरूप पवार, जयराज इंगोले, गीतांजली देशमुख, अंजली कुंभार, प्राजक्ता डोंगरे हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.