शेतकऱ्यांनो, उसाचे पाचट जाळू नका, पाणी धरून ठेवण्याचे काम तेच करते - कृषीरत्न संजीव माने
लोहा (शुभम उत्तरवार)
अहमदपूर येथील दीप वर्षा मंगल कार्यालय येथे सिद्धेश्वर इंडस्ट्रीज लिमिटेड महेश नगर उजना वतीने कृषिरत्न संजीव माने यांच्या अवर्षण परिस्थितीत खोडवा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी तालुक्यातील शेतकरी बांधवांशी संवाद साधला वेळेत न पाऊस पडल्यामुळे शेतकरी बांधवांनीची ऊस लागवड लांबीवर पडली असल्याने खोडवा व्यवस्थापन योग्य पद्धतीने कसा करावा याबाबत त्यांनी उत्पादकांना मार्गदर्शन केले.उत्पादन क्षमता वाढ होत असताना जमिनीचा गाभा जपला गेला पाहिजे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी बांधवांनी आपल्या सर्वांगीण विकास करून घ्यावा. दूध उत्पादनाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांनी धवल क्रांती घडवण्याचा निर्धार करावा. शेतकरी बांधवांनी चिंता करू नये असे आव्हान त्याने केले. तसेच राज्यभरात सिद्धी शुगर इंडस्ट्रीज साखर कारखान्याची ख्याती पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आव्हान केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव,प्रमुख व्याख्याते कृषीरत्न संजीव माने, व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, संचालक सुरत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष
निवृत्तीराव कांबळे,व्हाईस प्रेसिंडेंट पी.जी होनराव ,जनरल मॅनेजर पि.एल. मिटकर , बळीराम इंगोले ,अंकुशराव कानवटे माजी उपसभापती तुकाराम पाटील तालुका कार्याध्यक्ष बाळू साखरे ,शिवकांत तरगुडे माजी चेअरमन सिद्दाजी माने आधी शेतकरी व सभासद बांधव उपस्थित होते.
पाण्याचा सुयोग्य वापर करावा
उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने जमिनीची सुपीकता, सेंद्रिय खताचा वापर, जिवाणु संख्येची बाड, कंपोस्ट खताचा वापर, साडेचार फुटापेक्षा जास्त रुंदीची सरी, पाण्याचा सुयोग्य वापर करावा असा पाणी पीत नाही, याला आदतेची आवश्यकता असते. ऊस पाचट पेटवून द्यायचा नाही अत्यंत कमी पाण्यात खोल्याचे उत्पादन घेण्यासाठी पाचट जाळायचे नाही पानगी दिल्यानंतर पाचट जमिनीवर खालच्या बाजूला बसून आच्छादन होते तेथून आपोआप कुजण्यास सुरुवात होते. अवर्षण परिस्थितीत पाणी धरून ठेवण्याचे कान पाचट करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
रासायनिक खताचा डोस द्या
जुन्या नारवा तोडल्यानंतर नक्ष्या जारवा मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी फॉस्फरस आणि ह्युमिक ऍसिड याची आवश्यकता असते. शास्त्रोक्त पद्धतीने उत्पादन घेतले तर अत्पादनात मोठया प्रमाणावर वाढ होते. सूक्ष्म अन्नद्रव्य, गंधक, मंशियम सल्फ "ट आदी औषधांची फवारणी करून उत्पन्नात वाढ होऊ शकते, अवर्षण परिस्थितीत पावट जाजू नक्व, त्याची कुट्टी करू नका, वरंबा रिकामा करा, बुद्धाचे छाटून घ्या, रातायनिक खताचा डोसाचा परिणाम उत्पादन वाढीसाठी होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.