पंढरपूर सिंहगड मध्ये "आयडियाथाॅन" इव्हेंट संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "आयडियाथाॅन" इव्हेंट संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी आय आय सी च्या माध्यमातून आयडियाथाॅन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तारापाका युनिव्हर्सिटी, चीली (साऊथ अमेरिका) येथील डॉ. अतुल सागडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थितांना उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व प्रमुख पाहुणे डॉ.अतुल सागडे यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. शिवाय डाॅ. अतुल सागडे यांनी या दरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या प्रकल्पामध्ये संशोधन या विषयावर माहिती दिली.

या कार्यक्रमा दरम्यान सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय व तारापाका युनिव्हर्सिटी, चीली (साऊथ अमेरिका) यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

या कार्यक्रमात विविध विभागातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्प संकल्पनांचे सादरीकरण केले.

   या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी गीतांजली सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.